कैवल्यधाम

सांगली

About कैवल्यधाम विषयी माहिती

प. पू. श्रीसद्गुरू तात्यासाहेब कोटणीस महाराजांची हि परंपरा त्यांचेच चिरंजीव रघुनाथ उर्फ दादा यांनी सांभाली. १९३८ साली 'कैवल्यधाम' ह्या नावाने महाराजांनी समाधी वजा प्रेरणास्थान बांधले ज्यात त्रिमूर्तींची स्थापना केली. त्यास ओरिसाचे गर्व्हनर उपस्थित होते. ह्या वास्तूत सर्व संतांची हाताने काढलेली चित्रे उपलब्ध आहेत. अनेक संतांची वापरलेल्या वस्तूंचे वस्तूसंग्रहालय आहे. ह्यात समर्थ रामदासस्वामी, श्रीधर स्वामी, माणिक प्रभू महाराज, मामासाहेब दांडेकर अशा अनेकांनी वापरलेल्या वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. ह्या बरोबरीने १०००० धार्मिक पुस्तकांचे ग्रंथालय आहे. जात सर्व धर्माची / संतांची पुस्तके उपलब्ध आहेत. सद्गुरु दादासाहेबांनी १९७३ साली देह ठेवला. तोपर्यंत ते नित्य किर्तन करत होते. त्यानंतर ही परंपरा गुरूनाथ महाराज आजही त्याच तळमळीने, निष्ठेने, आदराने सांभाळत आहेत.

नित्य परंपरा

महाराजांनी आखून दिल्या प्रमाणेच सर्व कार्यक्रम होत असतात. महाराजांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या प्रमाणात ५ दिवस साजरा करण्यात येतो ह्यात आजपर्यंत अनेकांनी सहभाग घेतला आहे. ह्यात प्रामुख्याने मामासाहेब दांडेकर, जोग महाराज, धुंडा महाराज देगूलकर, श्री. राम शेवाळकर, श्री. सु. ग. शेवडे, मा. गो. वैद्य, कै. सुदर्शनजी, भैय्याजी जोशी, करवीरपिठ, श्रृंगेरीपिठ, काशी पिठ येथील शंकराचार्य, आचार्य गोविंद देवगिरीजी ह्या सारख्ये अनेक महात्मे येऊन गेले आहेत. व आजही येत आहेत. स्वर्गीय भारतरत्न लता मंगेशकरजी अनेक वेळा दर्शनासाठी येत होत्या त्यांचे वडीलांचे गाणेही १९३८ साली केवल्यधाम बांधत असताना दादासाहेब महाराजांच्या साक्षीने रात्री १ ते पहाटे ५ पर्यंत झाले आहे. हे निश्चितच आनंददायी आहे. देव, देश, धर्म, संत साहित्याचा प्रसार कार्य हेच प्रमुख उद्देश असून हे कार्य निरपणे आजपर्यंत सुरू आहे. ही परंपरा सांगलीच्या लौकिकात फार मोलाचे योगदान देणारी आहे. जशी नाट्य पंढरी आहे तशीच किर्तन पंढरी सुध्दा आहे. किर्तन पंढरी हा लौकिक वाढत असून महाराजांचे अनेक शिष्यगण पूर्ण भारत व परदेशातही आहेत. कैवल्यधाम येथे साजऱ्या होणाऱ्या अनेक कार्यक्रमात अन्नदान ही मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून ह्या कोणाकडूनही कोणत्याही आर्थिक गोष्टींची मागणी केली जात नाही. अशी ही सांगलीची किर्तन परंपरा असून आजही चौथ्या पिढीकडूनही ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ती परंपरा वाढविण्याचा आमचा मानस असून त्यास महाराजांचे पाठबळ व आर्शिवाद मिळेल अशी आमची नितांत श्रध्दा व विश्वास आहे.

॥ राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय ॥

  • कैवल्यधामात रोज पहाटे ४ ते ६ काकड आरती महापूजा होते. रात्रौ ८ वा. पंचपदी व शेजारती केली जाते.
  • सद्गुरु तात्यासाहेब महाराजांनी सुरु केलेली अखंड किर्तन परंपरा रोज सायंकाळी ६ ते ७.१५ यावेळेत सुरु आहे.
  • दासनवमी, रामनवमी, हनुमान जयंती, दत्त जयंती, गुरुपौर्णिमा हे उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरे होतात.
  • पौष व. २ ते पौष व. ६ सद्गुरु तात्यासाहेब महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या प्रमाणात अन्नदानासह साजरा केला जातो.
  • महापूर, कोरोना या आपत्तीकाळात सामाजिक बांधिलकी साधत. अनेकांना कोणतीही प्रसिध्दीची अपेक्षा न करता मदत केली आहे.
  • अशा या कैवल्यधामास ८५ वर्षे पूर्ण होत आहेत.
  • २०२३ २४ सद्गुरु तात्यासाहेब महाराजांचा शताब्दी पुण्यतिथी महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. हा सांगलीच्या वैभवात भर घालणारा असा कार्यक्रम आहे. ह्या कार्यक्रमात आपण सर्वजण तन-मन-धनाने सहभागी व्हावे व आपला आनंद द्विगुणीत करावा हीच इच्छा!
  • कोटणीस महाराज

    प. पू. श्रीसद्गुरू तात्यासाहेब कोटणीस महाराज यांचे पर विजापूर प्रांतातील केरूर गावचे. महाराजांचे पणजोबा हे श्रीमंत मुधोळा घोरपडे यांचे फडणीशीचे काम सांभाळत नंतर कोटणीशी (कोठ प्रमुख) देण्यात आली तेव्हा पासून घराण्याचे आडनाव कोटणीस आहे.

    थोडक्यात परिचय

    जन्म:

    वडीलांचे नांव पांडुरंग आई सौ. रखुमाबाई ह्याचे उद हणमंतरावजींचा जन्म सांगली संस्थानातील तेरदाळ गावी ७ नोव्हेंब १८६४ साली झाला. त्यांचे बालपण मुधोळ येथे गेले. १८७१ मध्ये मराठ शाळेस जाण्यास सुरवात केली. १८७३ मध्ये त्यांचा व्रतबंध झाला पूर्वीसारख्या मराठी चार इयत्ता नंतर १८७५ पासून इंग्रजी शाळेत जाऊ लागले.

    • जन्म सांगली संस्थानातील तेरदाळ गावी
    • ७ नोव्हेंब १८६४
    • १८७५ पासून इंग्रजी शाळेत जाऊ लागले.

    शिक्षण:

    मॅट्रीक

    मुधोळस त्यांना त्यावेळी दादाचार्य कट्टी नावाचे विद्वान शास्त्री होते त्यांचेकडे ते ३ री ते ४ थी शिकत असतानाच रूपावली, समासचक्र व इतर संस्कृत अध्यापन शिक्षण घेत होते पाठांतर अप्रतिम म्हणजे ह्यांना एकदा वाचले की पूर्ण पाठ, असे एकपाठी त्यामुळे त्यांनी ह्या संस्कृत शिक्षणात वाहवा मिळवली. पुढे ते इंग्रजी ५ वी साठी कलादगी येथे गेले ते शिक्षण चालू असताना ते पब्लीक सर्व्हिस सर्टीफिकेट परिक्षेस (मुलकी नोकरीची परीक्षा) बसले व पास झाले. १७ व्या वर्षी विवाह झाला. १८८१ साली हा विवाह समारंभ पार पडला. लग्नानंतर पत्नीचे नाव लक्ष्मी ठेवण्यात आले. सुप्रसिध्द इतिहासकार संशोधक कै. वासुदेव शास्त्री खरे हे संस्कृतचे अध्यापक होते त्यांनी यांचे संस्कृतचे प्रेम इंग्रजीवरचे प्रभूत पाहून त्यांचेकडून आपण इंग्रजी शिकावे व संस्कृत शिकवावे असा बेत केला व त्याप्रमाणे हा गुरू शिष्यांचा शिक्षण-विनिमय वर्षभर सुरू राहील. १८८२ साली मिरज हायस्कूल मधून ते मॅट्रीकची परिक्षा पास झाले. स्वभाव मनमिळावू, व्यवहार कुशल, उत्तम चित्रकला, संस्कृत, मराठी, कविता रचना, कानडी पदे उपलब्ध आहेत.

    नोकरी व वकिलीचे शिक्षण:

    मॅट्रीक होताच मुधोळ सरकारची नोकरीवर हजर होण्याची नोटीस मिळाली. १८८३ च्या जानेवारीस त्यांची नेमणूक मुधोळ येथे कारभारी कचेरीतील इंग्रजी शाखेकडे कारकून म्हणून झाले. त्यांना दरमहा २० रू. पगार मिळू लागला. अनेक मोहाचे प्रसंग येऊनही ठाम राहिले हेम महत्वाचे. ह्याच कालावधीत त्यांनी वकिलीचे शिक्षणही पूर्ण केले.

    सद्गुरूंची भेट:

    ह्या दरम्यान त्यांची बाबासाहेब मुजुमदार ह्यांचे बरोबर गाठ पडली त्यांच्यात घडत असलेले बदल बघून त्यांनी विचारले हे कसे झाले त्यावर त्यांनी सांगितले हे सद्गुरूमुळे शक्य झाले. त्यावेळी त्यांनी महालिंगपूर जवळ असणाऱ्या चिमड येथील सत्तपुरूष श्री सद्गुरु रामचंद्र महाराज यरगट्टीकर यांचे चरणी नेले. हा संप्रदाय आदिनाथापासून सुरू होत असून भाऊसाहेब महाराज निंबर्गीकर यांचे आर्शिवादाने निंबर्गी येथे वाढला त्यास निंबर्गी संप्रदाय म्हणतात. सद्गुरु रघुनाथप्रिय साधु महाराज हे निंबर्गीकर महाराजांचे शिष्य येथे राहिले म्हणून त्यास चिमड संप्रदाय म्हणतात. त्यांचेच आज्ञेने पुढे ही परंपरा रामचंद्र महाराजांनी चालविली त्यांनी यथायोग्य वेळ येताच तात्यांना ज्ञानोपदेश दिला १८८६ मार्गशीर्ष वद्य ५ अनुग्रह दिला. गुरूवर पूर्ण श्रध्दा विश्वास याने त्यांची दिनचर्या बदलत निघाली. कोर्टाची कामे ही सुरू झाली, पण ५. पर्यंतच काम करत नंतर परमार्थासाठी वेळ देत. बेळगांव सांगली येथे वकीली केली. १८९५- श्री सद्गुरु भाऊसाहेब महाराज निवर्गीकर ९६ उत्तम वकीली सुरू झाली. काम ही उत्तम सुरू झाले नाव लौकिक ही वाढू लागला. १८९७ बेळगांवहून तेरदाळास प्रयाण केले.

    नित्य किर्तनास प्रारंभ:

    : एप्रिल १८९० पासून किर्तनास प्रारंभ केला. गुरूंनी आज्ञा केल्यानंतर सुरूवात केली. ३१ डिसेंबर १८९९ पुत्रप्राप्त झाला त्यांचे नांव रघुनाथ. त्यांनी ही किर्तन परंपरा वाढविली. किर्तन परंपरा मोठ्या जोमाने १८९८ पासून सांगलीत सुरू झाली सुरवातीस असणारी श्रोत्यांचा संख्या वाढत जाऊन १०००० पर्यंत पोहोचली. पाठांतर भरपूर, अनेक दाखले देत ते किर्तन करत विषय समजावून देत. अनेकांना हे मानवत नव्हते. त्यांना ही अडचणींचा प्रयत्न केला, पण निष्ठा / श्रध्दा ह्यामुळे ते जराही विचलीत न होता किर्तन सेवा चालवत राहिले. राज घराण्याचा राजाश्रयही लाभला अनेक राजघराण्यात उदा. कुरूंदवाडकर, सांगलीकर पटवर्धन सराकर अशा अनेक लोकांनी त्यांची किर्तने ऐकली व कार्यक्रमही ठेवले. ह्या दरम्यान त्यांनी आपल्या सद्गुरूंचे ठिकाणी चिमड येथे धर्मशाळा रूपी वास्तू बांधावी असा संकल्प केला. १९०७ साली खर्चाचे अंदाज करून १५०० रू. खर्च असे ठरले व ते काम सप्टेंबर पर्यंत पूर्ण झाले. ह्यावेळेपर्यंत महाराजांचा किर्तन लौकिक सर्वत्र पसरत होता. १९०५ साली संकेश्वर मठाचे शंकराचार्य व श्री. ल. रा. पांगारकर अशा अनेक विभूती कार्यक्रमास येऊ लागल्या. सांगलीकर / मिरजकर / कुरूंदवाडकर अशी अनेक राजघराणे किर्तनासाठी येऊ लागली. इचलकरंजीकरांनी त्यांचे नवरात्र उत्सवात महाराजांचे किर्तन ठेवले. सांगली तर किर्तन पंढरी होत होती. १४ डिसेंबर १९०५ ते २१ डिसेंबर १९०५ पुणे येथील मुमुक्षु वर्तमानपत्रात "कोटणीसांची किर्तने" ह्या संदर्भात दोन लेख आले व त्यानंतर त्याने तर प्रसिध्दी चोहोकडे करू सोडली. १९२२ साली चिमड मठातील धर्मशाळेवर दुमजली बांधली. हणमंतरावांनी १८८६ साली अनुग्रह मिळाल्यानंतर १६ वर्षात संतपदास पोहोचले. १९०६ साली सद्गुरुनी अखंड वापरलेल्या गुरूपादुका मिळाल्या ज्या आजही जतन केल्या आहेत. १९२० साली ज्योतिष्य संमेलनास लोकमान्य टिळक सांगलीत आले असताना महाराजांची किर्तन महती ऐकत से त्या किर्तनासाठी उपस्थित राहिले. त्यामध्ये त्यांनी देव, देश, धर्म असा त्यांचा किर्तनाचा परिपाठ बघतीला व त्यांनी त्यावेळी महाराजांबरोबर देव, देश, धर्म, स्वातंत्र्य ह्यावर चर्चाही केली. त्यानंतर शंकर श्रीकृष्णदेव हे ही अनेक वेळा येत असत. हे कार्य चालू असतानाच त्यांचे उत्तम काम बघून १९१५ साली सांगली नगरपालिकेने त्यांना त्रैवार्षिक निवडणूकीत दरबारने नेमून दिले. १९१७ साली मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन पद देण्यात आले. अशा पध्दतीने त्यांनी समाज कार्यही चालू ठेवले. ह्या बरोबरीने त्यांनी आपल्या घरात वारांनी शिक्षण घेणाऱ्या मुलांची भोजनांची सोय करत आपले शिक्षणाप्रती असणारे प्रेम व्यक्त केले. त्यांची एकदा तब्येत ठिक नसल्यामळे डॉक्टरांनी त्यांना पोळी खाण्यास सांगितले. ते फक्त अर्धी पोळी खात पण आपल्या बरोबरीने सर्वांच्या पानात ती असावी असा त्यांचा निग्रह होता. त्यामुळे सर्वांना पोळी घालून जेवणे होऊ लागली. ह्यातून सर्वांना समान वागणूक ही दिसून येते.

    जिवनाची सांगता:

    १९२३ साली चिमड मधील साधक व महाराज ह्यांचे बरोबर निंबर्गीस पायी जाण्याची यात्रा ठरली. त्यास तात्यासाहेब महाराजही सहभागी झाले. नुसतेच सहभागी झाले असे नाही तर बरोबर असणाऱ्या जवळपास ४०० ते५०० जणांचा सर्व खर्च महाराजांनी केला. तो त्या काळी रू. ६००० पर्यंत केला असे त्यांच्या बरोबर असणाऱ्या साधकांनी व महाराजांचे ज्यांनी चरित्र लिहिले ते राजकवी साधुदास जे महाराजांचे भक्त होते त्यांनी तो चरित्रात केला आहे. ह्यावरून त्यांची सद्गुरुचरणी असणारी निष्ठा व प्रेम, आदर दिसून येतो. यात्रेहून परत आल्यानंतर त्यांची तब्येत त्यांना साथ देईना तरी सुध्दा आजारपणातही त्यांनी नित्य किर्तन सेवा थांबवली नाही हा आदर्श त्यांनी आपल्या घराण्यामध्ये आखून दिला. अशी अखंड किर्तन सेवा करत जानेवारी १९२४ साली सायंकाळी ५ वा. महाराजांनी अखेरचा श्वास घेत आपला देह अनंतात विलीन केला. त्यांचे जीवन आम्हा शिष्यांना मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. त्यांची हि परंपरा त्यांचेच चिरंजीव रघुनाथ उर्फ दादा यांनी सांभाली. १९३८ साली 'कैवल्यधाम' ह्या नावाने महाराजांनी समाधी वजा प्रेरणास्थान बांधले ज्यात त्रिमूर्तीची स्थापना केली. त्यास ओरिसाचे गर्व्हनर उपस्थित होते. ह्या वास्तूत सर्व संतांची हाताने काढलेली चित्रे उपलब्ध आहेत. अनेक संतांची वापरलेल्या वस्तूंचे वस्तू संग्रहालय आहे. ह्यात समर्थ रामदासस्वामी, श्रीधर स्वामी, माणिक प्रभू महाराज, मामासाहेब दांडेकर अशा अनेकांनी वापरलेल्या वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. ह्या बरोबरीने १०००० धार्मिक पुस्तकांचे ग्रंथालय आहे. जात सर्व धर्माची / संतांची पुस्तके उपलब्ध आहेत. सद्गुरु दादासाहेबांनी १९७३ साली देह ठेवला. तोपर्यंत ते नित्य किर्तन करत होते. त्यानंतर ही परंपरा गुरूनाथ महाराज आजही त्याच तळमळीने, निष्ठेने, आदराने सांभाळत आहेत.

    • All
    • Page1
    • Page2
    • Page3
    • video
    • News

    नित्य परंपरा:

    महाराजांनी आखून दिल्या प्रमाणेच सर्व कार्यक्रम होत असतात. महाराजांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या प्रमाणात ५ दिवस साजरा करण्यात येतो ह्यात अनेकांनी सहभाग घेतला आहे. ह्यात प्रामुख्याने मामासाहेब दांडेकर, जोग महाराज, धुंडा महाराज देगूलकर, श्री. राम शेवाळकर, श्री. सु. ग. शेवडे, मा. गो. वैद्य, कै. सुदर्शनजी, भैय्याजी जोशी, करवीरपिठ, श्रृंगेरीपिठ, काशी पिठ येथील शंकराचार्य, आचार्य गोविंद देवगिरीजी ह्या सारख्ये अनेक महात्मे येऊन गेले आहेत. व आजही येत आहेत. स्वर्गीय भारतरत्न लता मंगेशकरजी अनेक वेळा दर्शनासाठी येत होत्या त्यांचे वडीलांचे गाणेही १९३८ साली कैवल्यधाम बांधत असताना दादासाहेब महाराजांच्या साक्षीने रात्री १ ते पहाटे ५ पर्यंत झाले आहे. हे निश्चितच आनंददायी आहे. देव, देश, धर्म, संत साहित्याचा प्रसार कार्य हेच प्रमुख उद्देश असून हे कार्य निर्यूहपणे आजपर्यंत सुरू आहे. ही परंपरा सांगलीच्या लौकिकास फार मोलाचे योगदान देणारी आहे. जशी नाट्य पंढरी आहे तशीच किर्तन पंढरी सुध्दा आहे. किर्तन पंढरी हा लौकिक वाढत असूनमहाराजांचे अनेक शिष्यगण पूर्ण भारत व परदेशातही आहेत. कैवल्यधाम येथे साजऱ्या होणाऱ्या अनेक कार्यक्रमात अन्नदान ही मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून ह्या कोणाकडूनही कोणत्याही आर्थिक गोष्टींची मागणी केली जात नाही. अशी ही सांगलीची किर्तन परंपरा असून आजही चौथ्या पिढीकडूनही ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ती परंपरा वाढविण्याचा आमचा मानस असून त्यास महाराजांचे पाठबळ व आर्शिवाद मिळेल अशी आमची नितांत श्रध्दा व विश्वास आहे. २०२३-२४ हे वर्ष महाराजांचे शताब्दी पुण्यतिथी वर्ष म्हणून साजरे होणार आहे. त्यात आपणासारख्या देव, देश, धर्म कार्य करणाऱ्यांनी सहभागी व्हावे हीच इच्छा!

    काकड आरती महापूजा

    कैवल्यधाम मध्ये रोज पहाटे ४ ते ६ काकड आरती महापूजा होते. रात्रौ ८ वाजता पंचपदी व शेजारती केली जाते.

    कीर्तन परंपरा

    सद्गुरु तात्यासाहेब महाराजांनी सुरु केलेली अखंड कीर्तन परंपरा रोज सायंकाळी ६ ते ७. १५ या वेळेत सुरु आहे.

    उत्सव परंपरा

    सांप्रदायातील सर्व विभूतींची पुण्यतिथी, जयंती त्या तिथीला साजरी केली जाते. दास नवमी, रामनवमी, हनुमान जयंती, दत्त जयंती. गुरु पौर्णिमा हे उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरे होतात.

    सामाजिक बांधिलकी

    समाजकार्य महापूर, कोरोना या आपत्ती काळात सामाजिक बांधिलकी साधत अनेकांना कोणतीही प्रसिद्धीची अपेक्षा न करता मदत केली आहे

    पुण्यतिथी महोत्सव

    पौष व २ ते पौष व ६ सद्गुरू तात्यासाहेव महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव मोठयाप्रमाणात अन्नदानासह साजरा केला जातो.

    २०२३-२०२४ शताब्दी पुण्यतिथी महोत्सव

    २०२३-२०२४ सद्गुरू तात्यासाहेब महाराजांचा शताब्दी पुण्यतिथी महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. हा सांगलीच्या वैभवात भर घालणारा असा कार्यक्रम आहे.

    २०२३-२०२४ सद्गुरू तात्यासाहेब महाराजांचा शताब्दी पुण्यतिथी महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. हा सांगलीच्या वैभवात भर घालणारा असा कार्यक्रम आहे. ह्या कार्यक्रमात आपण सर्वजण तन - मन -धनाने सहभागी व्हावे व आपला आनंद द्विगुणित करावा हीच इच्छा !

    Contact

    Location:

    ३००, कैवल्यधाम,
    संत कोटणीस पथ,
    सांगली - ६०२३३ फोन - २३३२४७९

    Call:

    +९१ ०२३३ २३३२४७९